तब्बल २७ तासांच्या थांब्यानंतर अखेर कोकण रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून रेल्वे सेवा ठप्प होती. रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती, मात्र अखेर रेल्वे रुळांवरील दरड बाजूला करून रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.तब्बल २७ तासांनंतर रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यानंतर मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना झाली आहे.
रेल्वे सेवा बंद असल्यामुळे चिपळूण, कणकवली आणि रत्नागिरी स्थानकांवर बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. दरड बाजूला काढण्यासाठी ३ जेसीबी आणि ५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम केले. रेल्वे रुळांची पाहणी केल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली.खेडच्या दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळल्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. अखेर २७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कोकण रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
खेडच्या दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने संपूर्ण कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे जनशताब्दी आणि तुतारी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. खेडमध्ये स्टेशन मास्तराच्या केबिनमध्येच प्रवासी घुसले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. रेल्वेकडून काहीच सांगितले जात नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला होता. चिपळूणला एक्सप्रेस 18 तास थांबली तरी देखील प्रवाशांना कसली सुविधा नव्हती.