माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी राज्यात वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. मात्र या प्रकरणात आता मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे.
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झाली नसल्याने मुनगंटीवार यांना क्लीन चिट देण्यात आला आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री होते. तेव्हा या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. सखोल चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीची स्थापना महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आली होती.
महाविकास आघाडीच्या काळात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालातून मुनगंटीवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ही मोहीम यशवीपणे राज्यात राबविण्यात आली आहे, असे देखील या अहवालात सांगण्यात आली आहे. त्यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.