जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू विभागातील डोडापासून 300 किमी अंतरावर असलेल्या कोटी गावातील शिया धार चौंड माता वनक्षेत्रात काल संध्याकाळी ही चकमक झाली. या घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. तसेच लष्करप्रमुखांकडून घटनेची माहिती देखील घेतली आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी सीओएएस जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. लष्कर प्रमुखांनी डोडा येथे सुरू असलेल्या काउंटर टेररिस्ट ऑपरेशनची माहिती दिली,” असे संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाने X वर पोस्ट केले.
“जम्मू आणि काश्मीरमधील डोडा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहेत,” असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी डोडा चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.
“डोडा जिल्ह्यात आमच्या लष्कराच्या सैनिकांवर आणि JKP जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल जाणून मला खूप वाईट वाटले. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांप्रती माझी तीव्र संवेदना,” जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू विभागातील डोडापासून 300 किमी अंतरावर असलेल्या कोटी गावातील शिया धार चौंड माता वनक्षेत्रात काल संध्याकाळी ही चकमक झाली. एका लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांनी बलिदान दिले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.