उत्तर कोरियामध्ये कोरियन के- ड्रामा पाहिल्याने ३० विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्या सरकारने विद्यार्थ्यांना ही शिक्षा दिली आहे. के- ड्रामा सिरीज पाहिल्याने ३० विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे. किम जोंग ऊन यांच्या आदेशानुसार के- ड्रामा सिरीज पाहिल्याबाबदल ३० विद्यार्थ्यांना भरचौकात गोळ्या घालण्यात आल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यातील तणाव सर्व जगताला माहिती आहे. हुकूमशहा किम जोंग ऊन उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा पाहण्यास बंदी घातली आहे. तसेच उत्तर कोरियामध्ये सोशल मीडिया आणि युट्युब चॅनेलवर देखील बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरियामध्ये केवळ रशियन सिनेमा आणि सरकारमान्य काही वेबसाईट्स वापरता येतात.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने दक्षिण कोरियातील नाटक व चित्रपट पाहण्यास बंदी घातली आहे. के- ड्रामा सिरीज दक्षिण कोरियातील असल्याने या ३० विद्यार्थ्याना शिक्षा देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ३० विद्यार्थ्याना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे वय १९ वर्षांपेक्षा कमी आहे.