वरळी हिट अँड रन केस अपघातामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल ४८ तासांनंतर अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी मिहीर शाहूला मुंबई पोलिसांनी आज शिवडी जोरात हजर केले होते. त्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपी मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीने आपली ओळख लपविण्यासाठी केस आणि दाढी गाडीतपच कापले असल्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान आज मिहीर शाह याची कोठडी संपत असल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले. वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर राजेश शहा याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले.
पुण्यातील पोर्शे ‘हिट अँड रन’ प्रकरणात संपूर्ण कुटुंबाचा असलेला सहभाग उघड झाला होता, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण शाह कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवून चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली होती. त्याचप्रमाणे मुंबईतील वरळी येथे नुकत्याच झालेल्या घटनेत, शिवसेना नेत्याच्या मुलाने मिहीर शाह याने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला ध़डक दिली, त्यात महिलेचा मृत्यू झाला.
रविवारी पहाटे वरळीच्या ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला. त्यानंतर महिरीने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्याला आधी ड्रायव्हिंग सीटवरून उठून शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले. तसेच या अपघाताचा आरोप ड्रायव्हरच्या डोक्यावर टाकण्याचाही त्यांचा प्लान होता. त्याप्रमाणे त्यांनी मुलाला सल्ला दिला असे समजते. तसेच ज्या बीएमडब्ल्यूने हा अपघात झाला तीच मुख्य पुरावा असल्याने ती गाडीच नष्ट करण्याची योजनाही राजेश शाह यांनी आली होती, असेही चौकशीतून समोर आले आहे. ज्यामुळे मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.