राज्यभरात सध्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्यांच्या केस मध्ये रोज नवीन नवीन अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान आज पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) टीम चौकशी करणार आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांसमोर पिस्तुल उगारल्याप्रकरणी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचे पथक या दोघांचा शोध घेत आहे.
काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचे शेतकऱ्यांना धमकी देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर यांचा तपास पुणे पोलीस करत होते आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पुणे पोलीस त्यांना पुण्याला घेऊन येणार आहेत.
महाड येथील एका हॉटेलमधून पूजा खेडकर यांच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांची तीन पथके त्या ठिकाणी शोध घेत होती. पूजा खेडकर च्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर यांचा तपास देखील केला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांना दात दिली नव्हती.
मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पौड पोलिसांचा एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे पोलीस निघून गेले होते. मनोरमा खेडकर यांनी बंदुकीच्या धाकाने शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काहीजणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मात्र आज महाड येथून पुणे ग्रामीण पोलीस आणि मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतला आहे.