सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी तर अत्यंत मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई आणि उपनगरात देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. दरम्यान पुढील काही तास हे मुंबईसाठी आणि राज्यातील काही भागांसाठी महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होतोय. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान आजही मुंबईत मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील तीन ते चार मुंबईसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. कारण या तीन ते चार तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उपनगर या भागात हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी अति ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य सरकार व प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले आहे. दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली बॅटिंग केल्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आल्याचे पाहायला मिळतंय. यावर्षी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाच्या तज्ञांनी वर्तवली आहे.