केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), पाटणा येथील तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) आणि पदवीपूर्व (UG) पेपर लीक प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप फेडरल एजन्सीने जप्त केला आहे. दरम्यान आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने फेरपरिक्षेबाबत देखील आपले निरीक्षण नोंदवले आहे.
कथित नीट घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने आपला निरीक्षण नोंदवला आहे. संपूर्ण परीक्षेत सुनियोजित घोटाळा झाला आहे. त्याचा फटका 23 लाख परीक्षार्थींना बसलाय असं कोर्टाला पटवून दिले तरच फेर परीक्षेचे आदेश देणे योग्य ठरेल असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.
फेरपरीक्षा घेऊ नये अशी एनटीए आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यावर चर्चा करताना सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी देशातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे एकूण प्रवेश क्षमता किती आहे याची माहिती घेतली. नीटच्या कथित घोटाळ्यामुळे फक्त एक लाख 8 हजार परीक्षार्थीस बाधित होणार आहेत असं मत कोर्टाने व्यक्त केलं. एक लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व 23 लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा योग्य नसल्याचे मतही सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी नोंदवल आहे.
दुसरीकडे नीट पेपर फुटीचा तपास सीबीआय ने सुरू केला आहे. तर एकीकडे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पेपर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वकिलांनी पाचमे रोजी परीक्षा झाली आणि निकाल 14 जूनला जाहीर होणार होता. मात्र निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात आला असा युक्तिवाद केला.
नीट पेपर फुटीच्या प्रकरणात एकूण 40 याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे नीट चे फेरपरीक्षा घेऊ नये अशी एनटीए आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यावर चर्चा करताना न्यायमूर्तींनी देशातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे एकूण प्रवेश क्षमता किती आहेत याची माहिती घेतली. तसेच सुनियोजित घोटाळ्याचा फटका 23 लाख विद्यार्थ्यांना बसलाय असं कोर्टाला पटवून देण्यात आलं तरच फेर परीक्षेचे आदेश देणे संयुक्तिक होईल असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले आहे.