काही दिवसांपूर्वी विशाळगड पायथ्याशी असणाऱ्या एका गावात मोठा हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर आले होते. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर जाण्याचा निर्धार केला होता. मात्र त्याआधीच हा हिंसाचार घडला. त्यानंतर कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी देखील विशाळगडाला भेट दिली होती. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी पार पडली. त्यावेळी हायकोर्टाने सरकारला खडे बोल सुनावले आहे व विशाल गडाच्या अतिक्रमणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य भरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाची हायकोर्टात आज तातडीने सुनावली झाली असून, हायकोर्टाने राज्य सरकारने स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई हायकोर्टाने प्रशासनाला खडे बोल सुनावले. तसेच विशाळगडावरील अतिक्रमणाची कारवाई तातडीने थांबवण्याचे आदेश देखील दिले आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमण काढले जावे यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केली आहे. यासाठी काल त्यांनी गडावर जाण्याचा निर्धार केला. दरम्यान त्याआधी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता हिंसाचार प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या हिंचाराचामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशाळगड हिंसाचार प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान विशाळगडावरील या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विशाळगडाला भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री विशाळगडाच्या पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासन आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. विशाळगडावरील घटनेची माहिती मिळताच ते कोल्हापुरात दाखल झाले होते.