गेले अनेक दिवस भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडत आहेत. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आजच्या सोने आणि चांदीच्या घसरण झालेल्या दराबाबत माहिती जाणून घेऊयात.
दरम्यान, सोने आणि चांदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. याचा फायदा आता सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज किंवा फ्युचर्स मार्केटमध्ये सोने 675 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर हा 73480 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १३५० रुपयांची घसरण झालेली आहे. चांदीचा आजचा दर प्रतिकिलो ९०,४१८ रुपये इतका आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आता येत्या काही महिन्यात अनेक सण येणार आहेत. त्यामुळे सोने-चांदी दर कमी झाल्याने ग्राहकांना थोडा फायदा होण्याची शक्यता आहे.