Entertainment News : नॅशनल क्रश आणि बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी देखील अभिनेत्री एका वक्त्यव्यामुळे सर्वत्र चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘स्त्री 2’चे सर्वत्र प्रमोशन करताना दिसत आहे.
यावेळी देखील ती पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित केली. आता लोक या चित्रपटाच्या रिलीज आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकारांनी हजेरी लावली. तसेच मुख्य अभिनेत्री श्रद्धा देखील यावेळी हजर होती, ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये श्रद्धाला अनेक प्रश्न विचारण्यात आले, यावेळी तिला तिच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल देखील विचारले गेले, यावर अभिनेत्रीने असे काही उत्तर दिले की ती आता सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
यावेळी श्रद्धाला विचारण्यात आले की ती लग्न कधी करणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, ‘ती एकस्त्री आहे. जेव्हा तिला वधू व्हायचे असेल तेव्हा ती होईल.’
गेल्या महिन्यात जूनमध्ये श्रद्धा कपूरने तिच्या नव्या नात्याची पुष्टी केली होती. इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करताना तिने सांगितले की ती, राहुल मोदीला डेट करत आहे. श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबतचा एक सेल्फी फोटो पोस्ट केला होता.
विशेष म्हणजे तिने कॅप्शनमध्ये असे काही म्हटले की, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रद्धा कपूरने लिहिले होते, ‘माझं हृदय घे पण माझी झोप मला परत दे मित्रा…’ या पोस्टवरून तिच्या डेटिंगच्या अफवांना जोर आला. दरम्यान आता अभिनेत्रीने लग्नाच्या प्रश्नावर दिलेल्या त्या उत्तरामुळे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे दिसून येते आहे.