Ladli Behna Yojana 2024 : महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र्र सरकारने लाडली बहीण योजनेची घोषणा केली. 2024-25 चे अर्थसंकल्प 28 जून रोजी महाराष्ट्र विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडली बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 दिले जाणार आहेत. या योजनेमागचा उद्देश महिलांना आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबनाला चालना देणे हा आहे.
लाडली बेहना योजनेसाठी सरकारने 46,000 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करून याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात १ जुलैपासून सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट अशी आहे. अशातच जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्याकडे अजूनही या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे.
दरम्यान, आता या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याची तारीख सांगितली आहे.
अजित पवारांनी नुकतीच अहमदनगरमधील पारनेर या ठिकाणी एक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना कधी पैसे मिळणार आहेत याची तारीख सांगितली आहे.
येथे बोलताना अजित पवार म्हणाले, “तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिना १५०० रुपये देणार आहोत. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील.
ज्या गरीब माय माऊली आहेत, त्यांच्या काही गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली. सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
या तारखेला खात्यात पैसे येणार
पुढे बोलताना म्हणाले, “येत्या 19 तारखेला ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका बहिणीने मला राखी बांधली. आमचा प्रयत्न आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय-माऊलींच्या अकाऊंटला 3 हजार रुपये जुलै-ऑगस्टचे द्यायचे आहेत.”