Share Market : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड दिसून आली. सकाळी शेअर बाजार उघडताच आशादायक चित्र दिसले.
राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी आणि मुंबई शेअर बाजार सेन्सेक्सने सुरुवातीलाच मोठी झेप घेतली. आता बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
सकाळच्या पूर्व सत्रात सेन्सेक्सचे 25 स्टॉक्सने आघाडी घेतली होती. इंडसइंड बँक, पावर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि सन फार्मामध्ये घसरण दिसून आली. निफ्टीच्या टॉप गेनरमध्ये अल्ट्राटेक, एचडीएफसी लाईफ, आयसर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि ग्रासिम हे स्टॉक होते.
बजेट भाषण सुरु होण्यापूर्वी शेअर बाजाराने सकाळीच दमदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्सने 222 अंकांनी झेप घेतली आणि तो 80,724 अंकावर उघडला. तर निफ्टी 50 ने 59 अंकांची वाढ नोंदवली, निफ्टी 24,568 अंकांच्या स्तरावर उघडला.
सकाळी दमदार कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्सेमध्ये 138 अंकांनी घसरण झाली. थोड्या वेळात सेन्सेक्स 80,371 अंकांच्या जवळपास ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 मध्ये 64 अंकांची घसरण झाली. यावेळी निफ्टी 24,446 अंकांवर ट्रेड करताना दिसला. असे असले तरी आज दिवसभरात शेअर बाजार मोठे चढ उतार दिसून येतील.