आज भारताच्या अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात करतील. अर्थसंकल्पातून देशाच्या सर्व व्यवस्थांना काय काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्यांच्या पेटीतून काही विशेष निघते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अर्थसंकल्पात शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणाच्या बहुआयामी आणि बहु-अनुशासनात्मक भूमिकेशी क्वचितच कोणी असहमत असेल.तसेच २०४७ च्या विकसित भारतासाठी आजचा अर्थसंकल्प असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते देखील संसदेत दाखल झाले असून, निर्मला सीतारामन आता अर्थसंकल्प वाचनास सुरूवात करत आहेत.
शिक्षण, नोकरी आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १ लाख ५२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक शेतीवर भर दिला जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मला 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना आनंद होत आहे, ज्याचा केंद्रीय खर्च 2 लाख कोटी रुपये आहे. यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे…”
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. तसेच देशातील महागाई नियंत्रणात आहे. गरीब, महिला आणि तरुण यांच्यावर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प आहे असे अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.
केंद्र सरकारने बिहार राज्याला मोठे गिफ्ट दिले आहे. बिहार राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी २६ हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे.
महिला आणि मुलींसाठी ज्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ईशान्य भारतात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या १०० ब्रॅंचेस स्थापन केल्या जाणार आहेत.
ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई-व्हाऊचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जातील.
1. कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता
2. रोजगार आणि कौशल्ये
3. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
4. उत्पादन आणि सेवा
5. शहरी विकास
6. ऊर्जा संवर्धन
7. पायाभूत सुविधा
8. नवोपक्रम, संशोधन आणि विकास
9. नवीन पिढी सुधारणा
पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे १ कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.
पंतप्रधान आवास योजेअतंर्गत अतिरिक्त ३ कोटी घरे बांधली जाणार असल्याचे अर्थमंत्र्यानी संसदेत सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी 1 कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर केला. ते म्हणाले, ‘सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सुरू करणार आहे. यामध्ये 5000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6000 रुपये एकरकमी मदत दिली जाईल.
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील अर्थसंकल्प वाचताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज सरकारकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
सीतारामन यांनी देशाच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे. ही योजना बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आहे.
देशातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी १०० नवीन प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पाच वर्षांसाठी वाढवली, ज्यामुळे 80 कोटी लोकांना फायदा होणार आहे.
NPS वात्सल्य योजनेची घोषणा
हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास केला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यानी सांगितले.
ज्या शहरांची लोकसंख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. अशा १४ शहरांच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे.