Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत. तर करवाढीमुळे काही उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत.
गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये टीव्ही, स्मार्टफोन, कॉम्प्रेस्ड गॅस, कोळंबीचा चारा आणि प्रयोगशाळेत बनवले जाणारे हिरे इत्यादींच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर सिगारेट, विमान प्रवास आणि कापडाच्या किमती वाढल्या होत्या. या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि महाग काय झाले आहे? खाली सविस्तर पहा…
काय स्वस्त आणि काय महाग?
मोबाईल फोन – मोबाईल चार्जरवर 15 टक्के सीमाशुल्क कमी
कर्करोगाच्या तीन औषधांवर सूट
सोने-चांदीवरील सीमाशुल्क 6 टक्के पर्यंत कमी
प्लॅटिनमवरील सीमाशुल्क 6.4 टक्के पर्यंत कमी
गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भारतात मोबाईल फोन निर्मितीला चालना देण्यासाठी कॅमेरा लेन्ससह अनेक उपकारांवरील आयात शुल्क कमी केले होते. याव्यतिरिक्त, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लिथियम-आयन बॅटरीवरील कर दर कमी करण्यात आला.
जीडीपी 6.5 टक्के ते 7 टक्के दरम्यान वाढण्याची अपेक्षा
आर्थिक सर्वेक्षण 2024 नुसार, भारताचा GDP यावर्षी 6.5 टक्के ते 7 टक्के दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. किरकोळ महागाई देखील 2023-24 मध्ये 5.4 टक्के पर्यंत घसरली आहे, जी मागील वर्षी 6.7 टक्के होती. 22 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेसाठी सेवा आणि वाढीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.