संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये देशातील विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यानी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प २०४७ च्या भारताच्या विकासाचा पाया असणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने म्हणजेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला यांच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत आणि कोबटया वस्तू स्वस्त झाल्या आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.
स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी
१. सोने चांदी स्वस्त होणार.
२. मोबाईल
३ मोबाईल चार्जरच्या किंमती
४ मोबाईलचे सुटे भाग
५ कॅन्सर आजारावरील औषधे
६ लिथियम बॅटरी
७ पोलाद, तांबे उत्पादन प्रक्रियेवरील कर
८ इलेक्ट्रिक वाहने
९. सोलरच्या वस्तू
१०. चामड्यापासून तयार झालेल्या वस्तू
११. विजेची तयार
महागलेल्या वस्तूंची यादी
प्लास्टिक उत्पादने महागणार