Pune Rain : मोठ्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. अशास्थितीत पुण्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहेत, तसेच या पाऊसात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.
सध्या पुण्यातील खडकवासलाधरण ८५ टक्के क्षमतेने भरले असून परिस्थितीनुसार धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पुढील २४ ते ४८ तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
पुण्यासह महाराष्ट्रातही पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे, अशास्थितीत पर्यटकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही विकेंडला पाऊसात बाहेर पडण्याचा प्लॅन करत असाल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पर्यटकांनी विशेष करून पर्वत, झरे, किल्ले, घाट, या ठिकणी जाणे टाळावे.