Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अर्थमंत्र्यानी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला यांच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना एक आनंदाची बातमी दिली आहे. यावेळी त्यांनी सोने, चांदी आणि प्लॅटिनम आता पूर्वीपेक्षा स्वस्त होणार असल्याची घोषणा केली.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ची घोषणा करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशातील सोने आणि मौल्यवान धातूच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवण्यासाठी, सोने-चांदी वरील कस्टम ड्यूटी 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्के करण्याचा प्रस्ताव देते. अशास्थितीत आता सोने आणि चांदी पूर्वीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.