Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकरी, उद्योजक, तरुण आणि महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.तसेच लॉन्ग टर्म बेनेफिट देणाऱ्या घोषणांचा पाऊस पाडल्याचा बोललं जातंय. यातून एकीकडे बीजेपीचे मंत्री या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर कडाडून निशाणा साधताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अर्थसंकल्पावर निशाणा साधत एक्स (ट्विट) वर पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये त्यांनी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय दिले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोबतच ट्विटमध्ये त्यांनी, आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !! असे लिहिले आहे.