Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता आणखी एक उपडेट समोर आली आहे. यूपीएससीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्या आहेत. पूजा खेडकर यांना उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पूजा खेडकर यांना चौकशीसाठी मंगळवारपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र यापूर्वीच त्या गायब झाल्याचं बोललं जात आहेत, पूजा खेडकर यांचा फोन तसेच व्हाट्सप देखील बंद असल्याचे बोलले जात आहेत. तसेच त्यांनी याबाबत कोणतेही पात्र दिलेले नाही.
दरम्यान, पुण्यातील पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे समोर आले. अशास्थितीत चौकशीपूर्वीच पूजा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकच चर्चा होत आहे. ती म्हणजे आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी असतांना त्यांचे अनेक कारनामे चर्चेत आले. तेथील जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण बाहेर येत आहे. पूजा खेडकर या प्रकरणी रोज नवनवे खुलासे बाहेर येत आहे.
पुणे येथे प्रक्षिणार्थी अधिकारी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर असलेला दिवा, खोटे कागदपत्र, तसेच अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यांचे हे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. तक्रारीनंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. तसेच त्यांची चौकशी सुरु करण्यात आली.