Murlidhar Mohol : 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकरी, उद्योजक, तरुण आणि महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच लॉन्ग टर्म बेनेफिट देणाऱ्या घोषणांचा पाऊस पाडल्याचा बोललं जातंय. यातून एकीकडे बीजेपीचे मंत्री या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर कडाडून निशाणा साधताना दिसत आहेत.
विरोधकांच्या याच टीकेला आता केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीची माहिती दिली जात आहे, ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
“काही नेत्यांची वक्तव्य पहिली. अर्थसंकल्पात दोन राज्याच्या नावांचा विशेष उल्लेख झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. पण याचा अर्थ असा नाही की, हे बजेट 2 राज्याचं आहे. विरोधकांकडून खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेल्वेची महाराष्ट्रसाठी साडे पंधरा हजार कोटींची तरतूद आहे. नवे मार्ग देखील होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून चुकीची माहिती दिली जाते आहे, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.
महारष्ट्रासाठी अर्थसंकल्पात काय?
विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : ६०० कोटी
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : ४०० कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : ४६६ कोटी
पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प : ५९८ कोटी
महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : १५० कोटी
MUTP-३ : ९०८ कोटी
मुंबई मेट्रो : १०८७ कोटी
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर : ४९९ कोटी
MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी : १५० कोटी
नागपूर मेट्रो: ६८३ कोटी
नाग नदी पुनरुज्जीवन : ५०० कोटी
पुणे मेट्रो : ८१४ कोटी
मुळा मुठा नदी संवर्धन : ६९० कोटी