नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका खासगी विमानाला अपघात झाला आहे. या खासगी विमानातून १९ प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथक दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमान पोखरासाठी निघाले होते. सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. विमानतळावर तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाच्या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले आहे.