Majhi Ladki Bahin Yojana : महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र्र सरकारने लाडली बहीण योजनेची घोषणा केली. 2024-25 चे अर्थसंकल्प 28 जून रोजी महाराष्ट्र विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडली बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 दिले जाणार आहेत. या योजनेमागचा उद्देश महिलांना आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबनाला चालना देणे हा आहे.
लाडली बेहना योजनेसाठी सरकारने 46,000 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करून याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात १ जुलैपासून सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट अशी आहे. अशातच जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्याकडे अजूनही या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे.
दरम्यान, आता सरकारने या योजनेत आणखी बदल केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे. नवीन नियम लागू केल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवीन नियम :-
-लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाती स्वीकारली जातील.
-महाराष्ट्राबाहेर जन्मलेल्या परंतु स्थानिक पुरुषाशी विवाह केलेल्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या पतीच्या कागदपत्रांचा वापर करू शकतात.
-लाभार्थी महिलांची यादी दर शनिवारी ग्रामस्तरीय समितीद्वारे वाचून अद्ययावत केली जाईल.
-केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ऑफलाइन अर्ज भरावे लागणार आहेत.
-तत्काळ विवाह नोंदणी करणे शक्य नसल्यास, महिलेच्या विवाह प्रमाणपत्रानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून काम करेल.
-OTP चा कालावधी 10 मिनिटे निश्चित करण्यात आला आहे.
या तारखेला खात्यात पैसे येणार
येत्या 19 तारखेला ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात दोन महिन्यांचे एकूण ३००० णार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.