Rohit Sharma : भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल एक व्यक्त्यव्य केले आहे, जे सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. यावेळी गौतम गंभीर म्हणाले, “विराट-रोहित हवे तोपर्यंत वनडे क्रिकेट खेळू शकतात, त्यांना या फॉरमॅटमधून वगळले जाणार नाही.
मात्र, गौतम गंभीरच्या या वक्तव्याशी भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत अजिबात सहमत नाहीत. कृष्णम्माचारी श्रीकांतने रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे.
खरं तर, 1983 च्या विश्वचषकात टीम इंडियाच्या ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजावणाऱ्या कृष्णम्माचारी श्रीकांतने रोहित शर्मा 2027 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा भाग असण्यावर आपले मतभेद व्यक्त केले आहेत.
कृष्णम्माचारी श्रीकांतने त्याचा मुलगा अनिरुद्धसोबत त्याच्या यूट्यूबवर संवाद साधताना रोहित शर्माच्या फिटनेसची खिल्ली उडवली आहे. हिटमॅनबाबत तो म्हणाला की त्याने २०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा भाग होऊ नये. “विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे, पण रोहित शर्माने 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू नये. दक्षिण आफ्रिकेत तो बेशुद्ध पडेल” असे धक्कादायक विधान त्याने केले आहे.
कृष्णम्माचारी श्रीकांतने रोहित शर्मावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वीही हिटमॅनबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. आयपीएल 2024 दरम्यान कृष्णम्माचारी श्रीकांत म्हणाला होता की, रोहित शर्माने आपले नाव बदलून नो हिट शर्मा शर्मा ठेवावे. सध्या रोहित बाबत केलेल्या या वक्त्यव्यामुळे कृष्णम्माचारी श्रीकांतला ट्रोलिंगचा समान करावा लागत आहे.