राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावी आहे. आज देखील हवामान विभागाने पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात अति ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर कोल्हापूर, पुणे, कोकणात तर मुसळधार पाऊस होत आहे. कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरू आहे. आजही कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक नद्यांची धोका पातळी ओलांडली आहे. तर काही नद्या कधीही पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असिन, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
रायगडमधील कर्जत, पाली, नागोठणे, कोलाड, रोहा, महाड पोलादपूर या तालुक्यांना पावसाने जोरदार झोडपून काढले आहे. कुंडलिका, आंबा आणि सावित्री नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहेत. कोलाड येथे देखील मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्याने वाहून मंदावली आहे. महाड शहराला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड येथील जगबुडी नदी देखील धोका पातळीच्या वरून वाहत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पाऊस सूरु आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नाडीची पाणी पातळी इशारा पातळीकडून धोका पातळीकडे जाण्यास सुरूवात झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी सध्या ४२ फूट २ इंचावर पोहोचली आहे. तर या नदीची पातळी १० इंचाने कमी आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४२ फूट २ इंच इतकी आहे. नदीची धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास कोल्हापुरवर महापुराची संकट ओढवण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहराजवळील कळंब तलाव देखील भरला आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.