Pune Rain Updates : पुण्यात गेल्या २४ तासात मुसळदार झाला आहे. त्यामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पुण्यातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक भागांमधील घरे देखील पाण्याखाली गेली आहेत, सध्या पुण्यातील वेगवेगळ्या ठिकणी बचाव कार्य सुरु आहे, पुण्यातील पूर परिस्थितीवर वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा घेत आहेत.
दरम्यान, आज सकाळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत मी सतत हवामान खातं आणि अधिकाऱ्यांसोबत असल्याची माहिती दिली. तसेच पुण्यात पुढेही पाऊस राहणार असलयाचे सांगितले, यावेळी ते म्हणाले, मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केले आहे. तसेच एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असंही त्यांनी सांगितले, एकंदरीत अजित पवार यांचे पुण्यातील प्रत्येक विभागात लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार यांनी पुढे पुण्यातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याविषयी बोलताना सांगितले, जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. त्यामुळे रस्त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे.
पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले.
पुण्यात एवढी भयानक परिस्थिती का निर्माण झाली?
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, खडकवासला धरण हे अवघं पावणेतीन टीएमसीचं आहे. परंतु वरच्या भागातच आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे एकदम तीन टीएमसी पाणी धरणात आलं. अशास्थितीत, रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी आम्ही पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला , जेणेकरुन नागरिकांना सोयीचं व्हावं, तसेच शाळांना ताबडतोब सुट्टी देण्यात आली. पुण्यात सकल भागात पाणी साचलेलं आहे. सगळीकडेच पाऊस पडल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे. त्यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूने येणारं पाणी आणि ओढा-नाल्यांमधून येणार पाणी, यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे, पुढील दोन तीन दिवस अशाच पावसाचा अंदाज आहे. म्हणून काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.