Francis Debreto : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दुःखद निधन झाले आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वय ८२ इतके होते. आज दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे. आज पहाटे सुमारे ५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण चळवळीवादी कार्यकर्ते अशी होती.
धाराशिव येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक, लेखक अशी त्यांची ओळख आहे. धार्मिक क्षेत्रात देखील त्यांची मोठी ओळख होती.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव आज त्यांच्या घरी दुपारी साडे तीन पर्यंत राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना श्रद्धांजली वाहिली आहे.