Pune Rain Updates : पुण्यात गेल्या २४ तासात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशास्थितीत पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
सलग सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात, सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. अनेकांच्या घरात देखील घुसले आहे, विविध ठिकाणी बचाव कार्य सुरु असून, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. पुण्याच्या या परिस्थितीचा वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा घेत आहेत. दरम्यान, पुण्याची स्थिती पाहता अजित पवार तातडीने पुण्याला रावना झाले आहेत.
दरम्यान, खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना देखील अजित पवार यावेळी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचेही आवाहन केले आहे.