गेले काही दिवस राज्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना महापूर आला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल पुण्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुण्यात तर काल पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई,ठाणे, पालघर, कोल्हापूर शहरांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता ३१ हजारांवरून १३ हजारांपर्यंत आणण्यात आला आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्ववभूमीवर शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत, अशातच आता मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचाही निर्णय मध्य रेल्वे प्रशासने घेतला आहे.