Majhi Ladki Bahin Yojana : महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र्र सरकारने लाडली बहीण योजनेची घोषणा केली. 2024-25 चे अर्थसंकल्प 28 जून रोजी महाराष्ट्र विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडली बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 दिले जाणार असून या योजनेमागचा उद्देश महिलांना आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबनाला चालना देणे हा आहे.
सरकारच्या या योजनेवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात 1500 रुपये देऊन महिलांचा अपमान का करता? त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, सध्याच्या सरकारचे जे काही सुरू आहे त्याला अर्थिक बेशिस्त म्हणतात. देश किंवा राज्य चालवतान आर्थिक शिस्त म्हत्त्वाची आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकार मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करत सुटले आहे. त्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही. या योजनांसाठी कुठून पैसे आणणार याचे काही प्लानिंग नाही. निवडणुकानंतर या योजना बंद पडणार. कारण सरकार बदलणार हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे.
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये देण्याची घोषणा केली. महागाईच्या काळात सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.