फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आजपासून क्रीडा महाकुंभ अधिकृतपणे सुरू होत असून यामध्ये भारतातील ११७ खेळाडू सहभागी होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “पॅरिस ऑलिम्पिक खेळ सुरू होत आहेत. माझ्या संघाना शुभेच्छा. प्रत्येक खेळाडू हा भारताचा अभिमान आहे. ते सर्व चांगली कामगिरी करतील आणि खऱ्याखुऱ्या स्पोर्ट्समनशिपला मूर्त रूप देतील. त्यांच्या असाधारण कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळेल.” पॅरिसमध्ये शुक्रवारी झालेल्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाने या खेळांची सुरुवात झाली. हे प्रथमच सीन नदीवर आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यात भारतीय खेळाडूही सहभागी झाले होते. ज्याचे नेतृत्व पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिस स्टार शरथ कमल यांनी केले आणि एकूण 78 खेळाडू आणि 12 अधिकारी उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.
दरम्यान, काल ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच फ्रान्समध्ये गदारोळ झाला आहे. फ्रान्समधील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क अत्यंत अयशस्वी झाले आहे. फ्रेंच रेल्वे कंपनी SNCF म्हणते की त्याच्या हाय-स्पीड नेटवर्कवर जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे 8 लाख रेल्वे प्रवाशांना फटका बसला होता. दरम्यान स्पर्धेचे उदघाटन हे अत्यंत अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने करण्यात आले.
पॅरिस 2024 चा उद्घाटन सोहळा ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला. शुक्रवारी पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या अनोख्या उद्घाटन समारंभात दिसलेल्या तार्यांपैकी गायिका लेडी गागा आणि फ्रेंच फुटबॉल लीजेंड झिनेदिन झिदान यांचा समावेश होता. ऑलिम्पिक स्पर्धेचा अभूतपूर्व उद्घाटन सोहळा प्रथमच सीन नदीवर होत आहे.