Paris 2024 Paralympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संबोधित करत आहेत. पंतप्रधान 112 व्यांदा मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करत आहेत. तसेच, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी यावेळी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेबाबत बोलले, ज्याची सध्या जगभरात चर्चेत आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल मोदी म्हणाले, ‘ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडूंना जागतिक पटलावर तिरंगा फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते आहे. तुम्हीही तुमच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.’
पुढे ते म्हणले ‘काही दिवसांपूर्वी गणिताच्या जगातही ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये आमच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्ण पदके व एक रौप्य पदक जिंकले. देशाला गौरव मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुण्याचा आदित्य व्यंकट गणेश, पुण्याचा सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोएडाचा कनव तलवार, मुंबईचा रुशील माथूर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी यांचा समावेश आहे.
‘मन की बात’मधून खास आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोककला लोकप्रिय करण्यासाठी उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रकल्प परी हे एक मोठे माध्यम बनत आहे. रस्त्याच्या कडेला, भिंतींवर आणि अंडरपासवर बनवलेली खूप सुंदर चित्रे तुम्ही पाहिली असतील. ही चित्रे आणि या कलाकृती परीशी संबंधित असलेल्या कलाकारांनी बनवल्या आहेत. हे आपल्या सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य वाढवते, तर आपली संस्कृती अधिक लोकप्रिय होण्यास मदत करते.
7 ऑगस्टला ‘National Handloom Day’ साजरा केला जाणार
‘पुढे पीएम मोदी म्हणाले, “काही दिवसांनी ७ ऑगस्टला आपण ‘National Handloom Day’ साजरा करू. आजकाल हातमागाच्या उत्पादनांनी ज्या प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, ते खरोखरच खूप यशस्वी, जबरदस्त आहे पीएम मोदींनी स्थानिक उत्पादने बनवणाऱ्या लोकांना ‘हॅशटॅग माय प्रॉडक्ट माय प्राइड’ या नावाने सोशल मीडियावर मोहीम चालवण्यास सांगितले. हा छोटासा प्रयत्न अनेक लोकांचे जीवन बदलेल असे पंतप्रधान म्हणाले.