Sensex Opening Bell : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला आहे. बाजार उघडताच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने आपले सर्व जुने रेकॉर्ड मोडत आजपर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 100 अंकांच्या उंचीवर व्यवहार करताना दिसला. बाजारात प्रचंड तेजी असताना बँकिंग शेअर्समध्येही सर्वाधिक वाढ दिसून आली.
सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक
सोमवारी सकाळी 9.15 वाजता शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू होताच, बीएसई सेन्सेक्स 81,332.72 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत 81,679.65 च्या पातळीवर उघडला आणि उघडल्यानंतर तो जवळजवळ 400 अंकांनी झेप घेऊन 81,749.34 च्या पातळीवर पोहोचला. जी त्याची सर्वकालीन उच्च पातळी आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 380 अंकांच्या वेगाने व्यवहार करत होता.
निफ्टीहीनेही रचला इतिहास
सेन्सेक्सप्रमाणेच एनएसई निफ्टीही जोरदार वेगाने धावताना दिसत आहे. निफ्टीने 126.70 अंक किंवा 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 24,961.50 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. गेल्या शुक्रवारी मागील व्यवहाराच्या दिवशी तो 24,834 च्या पातळीवर बंद झाला होता. यानंतर, काही मिनिटांतच त्याने मोठी झेप घेतली आणि 24,980.45 ही पातळी गाठली, जी निफ्टी-50 ची नवीन सर्वकालीन उच्च पातळी आहे.
‘या’ 10 शेअर्समध्ये सार्वाधिक वाढ
शेअर बाजारात व्यवहार सुरू असताना, सुमारे 2264 शेअर्सने वाढ नोंदवली, तर 495 शेअर्स घसरणीसह लाल रंगात उघडले. याशिवाय 127 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. 10 शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात, ICICI बँक (2.04%), L & T शेअर (2 टक्के) SBI शेअरच्या (2 टक्के) वाढीसह व्यवहार करत होता. याशिवाय टाटा मोटर्स आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
मिडकॅप कंपन्यांमध्ये IOB शेअर (4 टक्के), बँक ऑफ इंडिया शेअर (3.70 टक्के), ऑइल इंडिया शेअर (3.34 टक्के), IDBI बँक शेअर (2.85टक्के) जास्त व्यवहार करत होते. तर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेला DCW शेअर 14 टक्के च्या वाढीसह व्यापार करत होता. या 10 शेअर्स व्यतिरिक्त रिलायन्स, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, इंडसइंड बँक, बीपीसीएल या शेअर्समध्येही वाढ दिसून आली.