Olympic Games Paris 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारी स्टार नेमबाज मनू भाकर हिला फोन करून तिचे अभिनंदन केले आहे. या पदकासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदक खाते उघडले आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजीत कोणतेही पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.
मनू भाकर हिचे फोनवर अभिनंदन करण्यासोबतच पंतप्रधान मोदींनी इतर सहकारी खेळाडूंच्या स्थितीबद्दलही विचारले. पीएम मोदींनी मनूला सांगितले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने तुमचा विश्वासघात केला होता, पण यावेळी तुम्ही सर्व उणीवा भरून काढल्या आणि पदक जिंकले.
पीएम मोदी म्हणाले, ‘तुमचे खूप खूप अभिनंदन, तुमच्या यशाची बातमी ऐकल्यानंतर मी उत्साहित आणि आनंदी आहे. मात्र, एक गुणामुळे सिल्वर मेडल राहिले, पण असे असतानाही तुम्ही देशाला वैभव मिळवून दिले. तुम्हाला दोन प्रकारचे क्रेडिट मिळत आहे. प्रथम, तुम्ही कांस्य पदक आणले आणि नेमबाजीत पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला ठरली आहेस. सर्वांकडून तुमचे अभिनंदन.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने तुमचा विश्वासघात केला. पण यावेळी तुम्ही सर्व उणीवा भरून काढल्या आहेत. मला पूर्ण आशा आहे की तुम्ही भविष्यातही चांगले काम कराल, सुरुवात खूप चांगली आहे, त्यामुळे तुमचा उत्साहही वाढेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. याचा फायदा देशालाही होणार आहे. बाकी सगळे सोबती तिथे सुखी आणि आनंदी आहेत का? असे म्हणत मोदींनी सर्व खेळाडूंची विचारपूस केली आहे. तसेच मोदींनी मनू भाकरच्या घरच्यांचे देखील कौतुक केले आहे. आणि विचापूस केली आहे.