Manu Bhaker : हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात जन्मलेल्या मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारत देशाचा गौरव केला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मनू भाकरसाठी ही मोठी कामगिरी आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीमुळे मनू भाकरचे सर्वत्र कौतुक होत आहे, तसेच मनू भाकरचे पालक देखील तिच्या या यशाचे भरभरून कौतुक करत आहे. मुलीच्या यशावर आईने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनू भाकर यांची आई यावेळी म्हणाल्या, मनूने डॉक्टर व्हावे अशी आमची इच्छा होती पण तिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले याचा आम्हला अभिमान आहे. मनूला लहानपणापासून काहीतरी करण्याची इच्छा होती. यामुळे ती कोणत्याही खेळात रस घेत असे. आणि आज तिने त्यात चांगली कामगिरी केली आहे.
सुमेधा भाकर सांगतात की, मनूच्या चांगल्या शिक्षणासाठी तिने गावातील शाळा सोडली आणि ती भिवानीला राहायला गेली. तिथं स्केटिंगमध्ये ती चांगली कामगिरी करत होती पण शाळेने तिला स्पर्धांसाठी बाहेर पाठवले नाही. तेव्हा ती चौथीत होती. यानंतर तिने ती शाळा देखील सोडली. आई सांगते की तिने आपली मुलगी मनूच्या शिक्षणासाठी सेहवाग इंटरनॅशनल स्कूलकडे वळले होते. पण तिथेही आपल्या कलागुणांना वाव देण्याची योग्य संधी न मिळाल्याने ती देखील शाळा सोडली. यानंतर मुनने युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. जेव्हा ती दहावीत होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला युनिव्हर्सल स्कूलमधील पिस्तुल शूटिंग खेळात प्रेरित केले.
आई सुमेधाच्या म्हणण्यानुसार, मनूने युनिव्हर्सल स्कूल रेंजमध्ये पहिला शॉट घेतला तेव्हा ते खूप चांगले होते. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 15 दिवसांनी ती महेंद्रगडला खेळायला गेली. तिथे तिने पदक जिंकले आणि बक्षीसही मिळवले. आई सुमेधा म्हणाल्या की, त्या दिवशी मनूच्या बक्षिसाची रक्कम तिने माझ्या हातावर ठेवल्याचे आठवते. यानंतर मनू पुढे जात राहिली. आणि तिने मागे वळून पहिले नाही.
अनेक खेळांमध्ये भाग घेतला
मनूची आई समुधा भाकर सांगतात की, मनूने स्केटिंग, घोडेस्वारी आणि क्रिकेटमध्ये देखील हात आजमावला. हे सर्व खेळ शिकले आणि चांगली कामगिरी केली. मनूच्या आईचे म्हणणे आहे की, मनू एक चांगली चित्रकार देखील आहे. मनूच्या आईचे म्हणणे आहे की, मनू कधीच हिम्मत हरली नाही तिने खूप संघर्ष केला. मनूला अशा खेळाचा भाग व्हायचे नव्हते. ज्यामध्ये फसवणूक होईल. अशा परिस्थितीत वडिलांच्या सांगण्यावरून ती पुढे सरकली. मनूच्या आईने सांगितले की, मनूने डॉक्टर व्हावे, अशी आमची मनापासून इच्छा होती, पण तिला त्याबद्दल आता कोणताही पश्चाताप नाही.
डॉक्टरांना फार कमी लोक ओळखतात
मनूच्या यशावर आनंदी झालेल्या आई सुमेधा यांनी काही काळ पिस्तुल प्रशिक्षक असलेल्या अनिल जाखड यांचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांनी एकदा सांगितले होते की, फार कमी लोक डॉक्टरांना ओळखतात. जेव्हा तुमची मुलगी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकेल, तेव्हा संपूर्ण जग तिला ओळखेल. आई सुमेधा म्हणाल्या की, ते जे बोलले ते बरोबर निघाले. मनूला जे काही करायचे होते. ती त्याच दिशेने पुढे सरकली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.