इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यात अकरा तरुण ठार झाले. फुटबॉलच्या मैदानावर हा हल्ला करण्यात आला. जिथे फुटबॉल खेळताना या तरुणांवर धक्का करण्यात आला आहे. हा हल्ला हिजबुल्लाने केल्याचा आरोप आहे. या बातमीनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपला अमेरिका दौरा अपूर्ण ठेवून परतत आहेत. याची मोठी किंमत हल्लेखोराला चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गोलन हाइट्स येथील फुटबॉल मैदानावर शनिवारी सायंकाळी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अकरा तरुणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामागे हिजबुल्लाचा हात असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हिजबुल्लाहने हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. विशेष बाब म्हणजे दक्षिण लेबनॉनवर इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह गटाचे तीन सदस्य ठार झाल्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत पण गोलान हाइट्सवरील हल्ल्यानंतर ते दौरा अर्धवट सोडून परतत आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इस्रायल या हल्ल्यावर गप्प बसणार नाही. हिजबुल्लाला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत हिज्बुल्लाने कधीही चुकवली नसेल.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘हा हल्ला दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल्लाचा खरा चेहरा दाखवतो. त्याने शनिवारी संध्याकाळी फुटबॉल खेळणाऱ्या मुलांना टार्गेट करून ठार केले. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात थेट युद्ध होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल-गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सतत गोळीबार होत आहे.