Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर याप्रकरणी दरोरोज नव नवीन खुलासे होत आहे. दरम्यान, या प्रकरणाबत आणखी एक अपडेट समोर येत आहे. तिसऱ्यांदा समन्स बजावूनही पूजा खेडकर पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळ केल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे केली होती. वाशिम पोलिसांनी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणात पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन लेखी जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र पूजा खेडकर अजूनही जबाब नोंदवण्यास हजर राहिल्या नाहीत.
गेल्या आठवडाभरापासून पूजा खेडक नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांचा फोन तसेच व्हाट्सप देखील बंद असल्याचे बोलले जात आहेत. तसेच त्यांनी याबाबत कोणतेही पत्र दिलेले नाही.
पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशिम पोलिसांकडे छळ केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने खेडकर यांना पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी त्यांना दोनदा समन्स बजाविले होते. त्यावेळी खेडकर यांनी पोलिसांकडे आठवडाभराचा अवधी मागितला होता. मात्र, आठवडाभरानंतरही त्या पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.