Mumbai : नवी मुंबईतील उरण परिसरात यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख नावाच्या मुलाचा गेल्या काही दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. यशश्रीची हत्या झाल्यापासून मुख्य आरोपी दाऊद शेख फरार होता. अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
25 जुलै रोजी नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्यात यशस्वी शिंदे हिच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासात पोलिसांना पट्रोल पंपावर एका मुलीचा मृतदेह अत्यंत दयनीय अवस्थेत पडलेला सापडला. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना फोन करून बोलावले आणि ही यशस्वी असल्याची पुष्टी केली.
पोलिसांनी तातडीने तरुणीला नवी मुंबईतील इंदिरा गांधी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दाऊदवर आरोप केले. याप्रकरणी पोलिस दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते, आता दाऊद शेख सापडला असून पुढील कारवाई सुरु आहे.
आरोपीवर 2019 मध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता
मुलीच्या वडिलांनी 2019 मध्ये दाऊद शेख नावाच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. संबंधित तरुणीची छेड काढल्यामुळे आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क केला आणि त्यातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.