राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांच्यावरील मुंबई हाय कोर्टातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने मलिक यांना तात्पुरता वैद्यकीय जामीन दिला होता. मलिक यांनी जामीन अर्जात आपल्याला अनेक आजारांचा त्रास असल्याचे सांगितले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकांचा जामीन सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.
दरम्यान, कुर्ला येथील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात पोलिसांनी नवाब मालिकांना अटक केली होती. नवाब मलिक हे अनेक दिवस कोठडीत होते. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मालिकांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन दिला होता. गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. २०२३ ऑगस्टमध्ये ते अटीशर्तींसह जामिनावर बाहेर आले होते. प्रकृतीच्या कारणावरून त्यांना जामीन देण्यात आला होता. दरम्यान नवाब मलिक हे राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणजेच अजित पवारांसोबत असल्याचे आपण पहिले आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसलेले पाहायला मिळाले होते.
मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते जाते परंतु देश महत्वाचा असे म्हणत मलिकांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत त्यांतून त्यांची मुक्तता झाल्यास आपण जरूर त्यांचे स्वागत करावे मात्र तूर्तास हे आरोप असे पर्यंत त्यांना महायुतीचा भाग न करणे योग्य ठरेल असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.