चार दिवसांपूर्वी पुण्याला पुराचा फटका बसला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुठा नदी दुथडी भरून वाहत हं. तसेच प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. दरम्यान पुण्यातील पुणे हॉस्पिटल ब्रिजवरून एका मुलगा पुराच्या पाण्यात पडल्याची घटना घडली आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ते वाहतुकीला बंद आहेत. मात्र अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पुणे हॉस्पिटल येथील ब्रिजवरून एक मुलगा पाण्यात पडला आहे. पुरात बुडालेल्या मुलाच्या शोधासाठी अग्निशमन दलाने दोन पथके पाठविली आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुराच्या पाण्यात पडलेल्या मुलाचे वय अंदाजे १२ वर्षे असण्याची शक्यता आहे. आजही खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने व पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध असा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे . त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. जुलै महिन्याच्या मध्यानंतर पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यावर्षी पहिल्यांदाच पानशेत धरणातून देखील विसर्ग करण्यात आला आहे.