यशश्री शिंदे हत्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यशश्रीच्या नातेवाईकांची उरण येथे भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.उरण हत्याकांडावर शर्मिला ठाकरेंनी पोलिसांना थेटच सांगितले आहे.तुमची दहशत दाखवा अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना कारवाईचे आवाहन केले आहे.तसेच केंद्र सरकारकडे शक्ती कायदा संमत करत तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.
आम्ही कमिशनरला भेटलो आहोत.‘शक्ती कायदा’ अमलात आणा अशी मागणी आपण केल्याचे शर्मिला ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.पंतप्रधानांनी याविषयी कठोर कायदा करावा याविषयी आम्ही पाठ पुरावा करणार आहोत असे्ही ठाकरे यांनी म्हटले आहे.शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करत म्हटले की,आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत.गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये कारवाई करताना पोलिसांना कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही.मात्र मुलींची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे.असे त्यांनी पोलिसांना सुनावले.
निर्भया प्रकरणात 16 वर्षांचा मुलगा सुटला. ज्या मुलात इतकी विकृती असेल,त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवायला हवे होते.किंबहुना फाशीच दिली पाहिजे. अशा गुन्हेगारांना रोखायचे असेल तर पोलीस काय करु शकतात, हे या नराधम पुरुषांना कळाले पाहिजे,असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे.आता कायदे बदलण्याची गरज आहे.अश्या प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅकवर चौकशी व्हायला हवी.पोलिसांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात.अशा काही घटनात राजकीय हस्तक्षेप होत असेल तर पोलिसांनी त्यांची नावे उघड करावीत.पोलिसांनी आता गुन्हेगारांविरोधात जहाल भूमिका घ्यावी,असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे.
उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी कर्नाटकमधून मुसक्या आवळल्या आहेत. दाऊद शेख याने २० वर्षीय यशश्रीची निर्घृण हत्या केल्याचे सांगितले जात असून आता त्याच्या चौकशीत संपूर्ण घटनाक्रम लवकरच समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.