गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज देखील हवामान विभागाने आज देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना रेड आणि तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्याना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईत देखील मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. आज पावसाचा जोर वाढणार आहे. आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यला देखील आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुण्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ११ वाजता १६ हजार २४७ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाने केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस होत आहे. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर आज अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे.