भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी-२० सिरीज सुरू होती. गौतम गंभीर प्रशिक्षक पदी नियुक्त झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच सिरीज होती. रोहित श्रमाने टी-२० फॉरमॅटमध्ये निवृत्ती घेतल्याने सूर्यकुमार यादवला ट्वेन्टी -ट्वेन्टी फॉरमॅटचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला या सिरीजमध्ये व्हाईटवॉश दिला आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला आहे. यासह भारताने मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. सुपर ओव्हरमध्ये भारतासमोर केवळ 3 धावांचे लक्ष्य होते, जे सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून पूर्ण केले.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना 9 गडी गमावून 137 धावा केल्या होत्या. या मालिकेत पहिल्यांदाच टीम इंडियाची फलंदाजी ढासळली. श्रीलंकेकडून शुभमन गिलने 39, रियान परागने 26 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 धावा केल्या. तर विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
भारताच्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावाच करू शकला. श्रीलंकेसाठी कुसल परेलाने 46 धावा, कुसल मँडिसने 43 आणि पाथुम निशांकाने 26 धावा केल्या. भारताकडून चार फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यात वॉशिंग्टन सुंदर, रवी विष्णोई, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता. रिंकू आणि सूर्याने प्रत्येकी एकच ओव्हर टाकली.