Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी येथील खासदार कंगना रणौतने यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी कंगना यांनी राहुल गांधी ड्रग्जचे सेवन करतात, त्यांची तपासणी झाली पाहिजे. असे म्हणत सणसणीत टीका केली आहे.
राहुल गांधी नेहमी नशेत असतात, त्यांची ड्रग्जची चाचणी व्हायला हवी, राहुल गांधी ज्या स्थितीत संसदेत पोहोचतात आणि ते ज्या प्रकारचे वाद घालतात, ते पाहता ते नेहमीच नशेत असतात. असे कंगनाने म्हंटले आहे.
याआधीही कंगना राणौत यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. कंगना यांनी 1 जुलै रोजी लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. राहुल गांधींनी ताबडतोब काहीतरी थेरपी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला होता. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान कंगना राणौत यांनी राहुल गांधींच्या भाषणांना बेजबाबदार म्हटले होते.
गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधी लोकसभेत केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी भाजपच्या निवडणूक चिन्हाला चक्रव्यूहाचे चिन्ह असे वर्णन केले होते. केंद्र सरकार चक्रव्यूह निर्माण करून देशातील जनतेला वेठीस धरण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हंटले होते. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी, सामान्य माणूस, अग्निवीर आणि महिलांचे प्रश्न मांडले होते.