जगप्रसिद्ध दहशतवादी संघटना हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याचा अखेर इराणची राजधानी तेहरान येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्यात हानियाचा अंगरक्षकही मारला गेला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनंतर हमासनेही दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. बुधवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दोघेही ठार झाल्याचे हमासने म्हटले आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हनियाची हत्या केली. त्यानंतर जगभरात याकडे इस्रायलचा मोठा विजय म्हणून पाहिले जात आहे. इस्रायलमध्ये सेलिब्रेशन सुरू आहे. आता इस्रायलने हा हल्ला केल्याचे उघडपणे मान्य केलेले नाही.
इस्रायलचे हेरिटेज मंत्री अमिचे इलियाहू हे हानियाच्या मृत्यूवर अधिकृतपणे प्रतिक्रिया देणारे पहिले व्यक्ती आहेत. जगातून ही घाण साफ करण्याचा हाच योग्य मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून 1200 हून अधिक लोकांची हत्या केली होती. मंगळवारीच हमास प्रमुख इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. आज पहाटे इस्रायलने हानियाच्या लपून बसलेल्या ठिकाणावर हल्ला करून त्यांची हत्या केली. या हल्ल्यात हानियाचा अंगरक्षकही मारला गेला आहे.
या वर्षी एप्रिलमध्ये इस्रायली सुरक्षा दलांनी हानियाच्या तीन मुलांची हत्या केली होती. गाझा पट्टीत हवाई हल्ल्यादरम्यान तिघेही ठार झाले. हानियाची तीन मुले आमिर, हाझेम आणि मोहम्मद हे दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा इस्रायलने केला होता. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले. तेव्हापासून इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध पुकारले आहे. इस्रायलचे लष्कर गाझामध्ये हमासवर सातत्याने लष्करी कारवाई करत आहे.
हमास प्रमुख इस्माईल हानिया यांचा जन्म 1962 मध्ये गाझा पट्टीतील अल-शाती निर्वासित छावणीत झाला. ते 2006 ते 2007 पर्यंत पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे पंतप्रधान होते. 2017 मध्ये त्यांना खालेद मेशालच्या जागी हमास प्रमुख बनवण्यात आले. याआधी इस्रायलने बेरूतमधील हिजबुल्लाहच्या ठाण्यांवर हल्ला केला होता. गोलन हाइट्सवर रॉकेट हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी कमांडरला लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाचा लष्करी कमांडर फुआद शुक्र ठार झाला.