26 वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची 26 जुलै रोजी संध्याकाळी धारावी परिसरात निर्घृणपणे भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबईतील धारावी परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
या हत्येप्रकरणी नियाज शेख आणि आरिफ या दोघांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये यासीन, शेर अली, शुभम आणि जुम्मन यांच्यासह इतर संशयितांची नावे आहेत. भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 103(2), 351(2), आणि 3(5) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अरविंद कुटुंबियासह धारावीत रहात होता. त्याचा मित्र सिद्धेश आणि परिसरातील तरुण अल्लू, आरिफ आणि शेरअली यांच्यात भांडण चालू होते. अरविंद त्यांचे भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी गेला. तेव्हा या तिघांनी त्याला अमानुष मारहाण केली.त्यानंतर पोलिसांसमोरच त्याची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या घटनेनंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रकारानंतर धारावीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून धारावीला छावणीचे स्वरूप आले आहे.
अरविंद वैश्य याच्या अंत्ययात्रेवेळी गरीब नवाज नगर या भागात दगडफेक झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आपण स्वतः यावेळी तिथे उपस्थित असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या स्थानिक मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्याचे समजते आहे.
वैश्य यांच्या मृत्यूने या भागातील जातीय तणावाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले गेले आहे. स्थानिक रहिवाशांनी मुस्लिम हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि समुदायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अधिक सुरक्षा उपायांची आवश्यकता असल्याचे चित्र समोर आले आहे.