आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने आरोपी विभव कुमार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’ला फटकारले आहे. बिभव कुमार गुंडाप्रमाणे वागला तसेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानात
तो कसा काय शिरू शकला , महिलेने तिची शारीरिक स्थिती सांगितल्यावरही त्याने तिच्यावर हल्ला केला.असा हल्ला करताना तुम्हाला लाज वाटली नाही का.. ? असा सवाल विचारत सर्वोच्च न्यायालयाने बिभव कुमार आणि आम आदमी पार्टीला यांना जाब विचारला आहे. खा.मालीवाल मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या बिभव कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने उपरोक्त भाष्य केले आहे. .
सुप्रीम कोर्टातील न्या. दीपंकर दत्ता, न्या. उज्ज्वल भुईया आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडापीठासमोर बिभव कुमाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी बिभवतर्फे युक्तीवाद करणारे ऍड. अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टाला सांगितले की, घटनेच्या 3 दिवसांनंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. मालिवाल यांचे आरोप बनावट आणि खोटे असल्याचेही सिंघवी यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. तसेच दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले आहे. यावेळी न्यायालय म्हणाले की, जखम लहान आहेत की मोठ्या हा प्रश्न नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हे सर्व कसे घडले याचे आश्चर्य वाटते आहे .मुख्यमंत्री निवास हा कुणाचा खासगी बंगला नाही. काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.असे न्यायालयाने सुनावले आहे.
उच्च न्यायालयाने 12 जुलै रोजी जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला बिभव कुमारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सिंघवी म्हणाले की, मालीवाल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या यावर न्यायालयाने विचारले की, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय हे खासगी निवासस्थान आहे का ? अशा नियमाची गरज आहे का ? यासंदर्भातील उशिरा केलेल्या तक्रारीबद्दलचे सिंघवी यांचे युक्तीवाद फेटाळताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, घटनेच्या वेळी मालीवाल यांनी 112 वर फोन केला होता. त्यामुळे मालीवाल यांनी बनाव केल्याचा तुमचा दावा खोटा ठरत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बिभव कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे मान्य करत पोलिसांना जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.