महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच राज्यांतील अनेक धरणे भरली असून, अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याचे ही वाढ झाली आहे.
मराठवाडा, सोलापूरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या उजनी धरणाने गेल्यावर्षीच्या पाणी साठवण पातळी ओलांडली आहे. लवकरच धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. भीमा नदीवर बांधण्यात आलेले हे धरण अनेक भागातील नागरिकांची तहान भागवते. पुणे जिल्ह्यात व जास्त करून खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस होत असल्याने उजनी धरणात पाणी जमा होत आहे. पाऊस होत नसला तरी उजनी धरण १०० टक्के भरते.
सध्या उजनी धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. आज दिवसभरात १०० टक्के पाणीसाठा उजनीत जमा होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून ,मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुलं आणि मुठा नदीपात्रातून हे पाणी उजनी धरणात जमा होत आहे. त्यामुळे उजनी धरण १०० भरल्यास सोलापूरसह अनेक भागातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.