पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूसह भारताला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या ही बिंग जियाओने सिंधूवर २१-१९, २१-१४ अशी मात केली.
सिंधूने रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताला पदकतालिकेत आघाडीवर ठेवले होते. यावेळी तिसऱ्या पदकाच्या निर्धाराने ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक करण्यासाठी उतरली होती. पण तिचे तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम १६ च्या सामन्यामध्ये सिंधूचा पराभव झाला आहे. . दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सिंधूने बुधवारी महिला सिंगल ग्रुप एममध्ये टॉपवर राहिल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या राऊंड ऑफ 16 मध्ये क्वालिफाय केले होते. सिंधूने तिच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा २१-५, २१-१० ने पराभव केला होता. सिंधूने याआधी तिच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फथीमथ नबाहा अब्दुल रज्जाकला २१-९, २१-६ ने पराभूत केले होते
तर पुरुष सिंगलमध्ये लक्ष्य सेनने क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. तर एचएस प्रणयला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पदकाचे मजबूत दावेदार समजली जाणारी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डीची जोडी क्वार्टर फायनल सामन्यात पराभूत झाली आहे.