महायुती सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर केले होते. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. दरम्यान या नामांतराला कोर्टात आव्हान देखील देण्यात आले होते. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. जिल्ह्याला नाव देण्याचा आणि नाव बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिला आहे असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. नामांतर झाल्यावर काही जण विरोधात तर काही जण समर्थन देत राहणार असे देखील कोर्टाने म्हटले आहे.
अलाहाबाद व औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्यातील दोन जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली असून, या राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान याचिका फेटाळून लावली आहे. नवे बदलणे हा राज्यसरकारच्या अधिकार आहे. त्यासाठी कोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. हायकोर्टाने तुमचे म्हणणे पूर्णपणे ऐकूनच सविस्तर आदेश दिले आहेत. त्यात पुन्हा आम्ही हस्तक्षेप करणार नाही.